रिक्षाचालक आत्महत्या, खाजगी सावकारावर गुन्हा दाखल
schedule07 Mar 24 person by visibility 949 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
रिक्षा चालकाच्या आत्महत्येप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी खाजगी सावकाराच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. उमेश रामचंद्र वेसनेकर (रा. म्हाडा कॉलनी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर) असे खासगी सावकाराचे नाव आहे.
खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून रिक्षा चालकाने आत्महत्या केली आहे.
खाजगी सावकाराच्या त्रासाला कंट्रोल रिक्षाचालक अमित उदयकुमार पाटील (वय ४३ रा. शाहू चौक, सहावा बस स्टॉप फुलेवाडी) यांनी आत्महत्या केली. पाण्याच्या टेकडी जवळ पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी कीटकनाशक प्राशन केले होते त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पत्नी अस्मिता अमित पाटील यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. रिक्षा चालक अमित पाटील यांनी खाजगी सावकार उमेश वेसनेकर यांच्याकडून रक्कम घेतली होती. सावकार वसनेकर याने पैसे वसुलीसाठी तगादा लावल्याने सावकारकिला कंटाळून त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचे तपासात पुढे आले आहे.