+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Apr 23 person by visibility 306 categoryमहानगरपालिका
विद्यार्थ्यांनी कष्टाचे सातत्य कायम राखावे---- शंकर यादव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, अभ्यास व सराव केला. तसाच अभ्यास  जीवनभर करत रहा असा सल्ला प्रशासनाधिकारी  शंकर यादव यांनी दिला.     कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या गुणगौरव व सत्कार समारंभप्रसंगी  ते बोलत होते. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यशस्वी स्थान प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापकांचा तसेच विविध गुणवंत सभासदांचा सत्कार यावेळी शाहू स्मारक भवन येथे करण्यात आला.  पतसंस्थेचे सभापती उमर जमादार हे अध्यक्षस्थानी होते.
  पतसंस्थेच्या सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले त्याबद्दल सर्व संचालकांना यादव यांनी धन्यवाद दिले. यावेळी पतसंस्थेच्या कामाचा आढावा तसेच पतसंस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची  माहिती सुधाकर सावंत यांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक संजय पाटील, वसंत आडके, राजेंद्र गेजगे, लक्ष्मण पवार ,भारती सूर्यवंशी ,मनीषा पांचाळ, विजय माळी, नेताजी फराकटे,प्रभाकर लोखंडे, प्रदीप पाटील, सुनील नाईक, उमेश देसाई, मंजीत भोसले, संजय कडगावे , उत्तम कुंभार सुनील पाटील आदि  उपस्थित होते. रावसाहेब कांबळे व स्वाती खाडे यांनी सूत्रसंचालन केले.  उपसभापती कुलदीप जठार यांनी आभार मानले.