एनआयटी कोल्हापूरमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
schedule05 Jun 24 person by visibility 409 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (पूर्वाश्रमीचे न्यू पॉलिटेक्निक) या काॅलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण पार पडले. हा उपक्रम ग्रीन क्लब, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी (एनसीपी), कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (केएमए), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), सोसायटी ऑफ ॲनेस्थेशीयाॅलाॅजीस्ट्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या उपक्रमात निसर्गमित्र सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनातून काॅलेज परिसरात १०१ देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपक्रमात संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, एनसीपीचे प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर, प्राचार्य डाॅ. रविंद्र कुंभार, केएमएचे अध्यक्ष डाॅ. अमोल कोडोलीकर, सेक्रेटरी डाॅ. शीतल देसाई, खजानीस डाॅ. अरूण धुमाळे, डाॅ. संजय घोटणे, आदींनी सहभाग घेतला.