+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Apr 24 person by visibility 262 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : 
रणरणते उन्ह नकोसे वाटत असले तरी या चित्रातील मनमोहक रंगरचना हव्याहव्याशा वाटतात, त्यामुळेच हे प्रदर्शन लक्षवेधी ठरते, असे प्रतिपादन चित्रकार अस्मिता जगताप यांनी केले. 
 चित्रकार प्रवीण वाघमारे यांच्या मोमेण्ट आॅफ समर’ चित्रप्रदर्शनाचा उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक कलादालनामध्ये ज्येष्ठ चित्रकार जगताप, दळवीज आर्ट इन्स्ट्यिूटच्या सचिव अर्चना अंबिलधोक , कीर्तीकुमार प्रभू, प्राचार्य अजय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे, प्रसन्ना वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले
या प्रदर्शनात जलरंगातील वास्तव वादी ते अमूर्त वादी शैलीपर्यंत रेखाटलेल्या कलाकृतीचा समावेश आहे.
या प्रदर्शनात उन्हाळी हंगामातील सकाळ आणि संध्याकाळचा कवळा ऊन खिडकीतून गुंतागुंतीच्या लय आणि संवेदनांचा अभ्यास आहे. रंग, पोत आणि रचना यांच्या जाणीवपूर्वक परस्पर संवादाद्वारे, प्रत्येक कलाकृती निसर्गाच्या गतिमान सार अधोरेखीत करते. पाण्यावर सूर्यप्रकाशाचा खेळ आणि फुलणाऱ्या वनस्पतींच्या दोलायमान रंगांनी प्रेरित झालेले हे तुकडे ऋतूतील चैतन्याची प्रगल्भ भावना जागृत करतात. उबदार टोन आणि अर्थपूर्ण ब्रशस्ट्रोकच्या पॅलेटचा वापर करून, उन्हाळ्याच्या महिन्यांची व्याख्या करणारी आनंदी ऊर्जा आणि सतत बदलणारी चळवळ व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
यावेळी माजी प्राचार्य सुरेश पोतदार मनोज दरेकर, दिपक कांबळे , गजेंद्र वाघमारे , अभिजीत कांबळे , पार्श्वनाथ नांद्रे बबन माने, वैशाली पाटील , संदीप पोपेरे , अश्विनी वाघमारे, राहूल रेपे, शैलेश राऊत , आरीफ तांबोळी, विजय उपाध्ये,ओंकार कोळेकर,राजनंदीनी जगदाळे ' शिवराज भोसले यांच्यासह कला रसिक उपस्थित होते. प्रदर्शन दि. २१ एप्रिलअखेर सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.