Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवडकास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघातर्फे शाहू जयंती साजरीब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर ! पुण्यात अभिजनांना विद्या, कोल्हापुरात बहुजनांना शिक्षणाची सुविधा ! ! डॉ. मंजुश्री पवारशिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनसतेज पाटलांनी राजकारणात सभ्यता पाळावी, त्यांच्या विरोधात आमच्याकडेही व्हिडिओ - राजेश क्षीरसागरना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!

जाहिरात

 

गोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायम

schedule29 Jun 26 person by visibility 167 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर जवळपास तीस वर्षे सत्ता गाजवलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक आणि गोकुळचे माजी जर्मन अरुण नरके यांचा दोस्ताना पुन्हा एकदा दिसून आला. नरके गट हा गोकुळच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत असणार आहे. सोमवारी 29 जून रोजी महासैनिक दरबार हॉल येथे भारतीय जनता पार्टीतर्फे ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके हे समर्थकासह दाखल झाले आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी गोकुळचे माजी सर्व नरके संचालक चेतन नरके आणि माजी आमदार महाडिक यांची भेट घेतली.
 माजी आमदार महादेवराव महाडिक,  गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, व दिवंगत आमदार पी एन पाटील यांची गोकुळमध्ये अनेक वर्षे सत्ता होती. अरुण नरके हे गोकुळ मध्ये सलग दहा वर्षे चेअरमन होते. गोकुळच्या गेल्या निवडणुकीत महादेवराव  महाडिक, पी एन पाटील व अरुण नरके एकत्र होते. दरम्यान गेल्या निवडणुकीत गोकुळमध्ये सत्तांतर झाले. मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आली. तर माजी आमदार महाडिक, पी एन पाटील व अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे चार सदस्य संचालक निवडून आले होते. यामध्ये चेतन  नरके,  शोमिका अमल महाडिक, बाळासाहेब खाडे आणि अंबरीश घाटगे यांचा समावेश होता.
 गेल्या पाच -सात वर्षांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथ झाल्या. लोकसभा निवडणुकीत संचालक चेतन अरुण नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराजांना पाठिंबा दिला होता तसेच लोकसभा निवडणूकपासून चेतन नरके हे काँग्रेसचे आमदार व जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासोबत होते.
 गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने काही दिवसापूर्वी अरुण नरके गटातर्फे  स्वतंत्र मेळावा घेण्यात आला होता. मात्र त्यामध्ये त्यांनी आपण कोणाला पाठिंबा देणार याविषयी जाहीर वाच्यता केली नव्हती. दरम्यान गेले दोन दिवस यासंदर्भात घडामोडींना वेग आला होता. अरुण नरके व महादेवराव महाडिक यांच्यामध्ये चर्चा झाली. गोकुळच्या आगामी निवडणुकीत अरुण नरके यांना मानणारा गट हा भारतीय जनता पक्षासोबत जाणार हे रविवारी 28 जून रोजी स्पष्ट झाले सोमवारी 29 जून रोजी महासैनिक दरबार हॉल येथे भारतीय जनता पक्षातर्फे ठराव तारकांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके हे समर्थकासहित दाखल झाले आहेत दरम्यान सोमवारी सकाळी अरुण नरके , चेतन नरके व  माजी आमदार महाडिक यांच्यात चर्चा झाली

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes