उपसंचालक कार्यालय : २५ हजाराची लाच घेताना तिघे जाळ्यात
schedule30 May 23 person by visibility 1636 categoryगुन्हे
आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षकासह तिघेजण ताब्यात
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सेवानिवृत्तीनंतर रजा रोखीकरण करण्याचे प्रस्ताव विनाअट मंजूर करून घेण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जाळ्यात पकडले. मारुती परशुराम वरुटे ( वय ५० वर्षे, सहायक अधीक्षक,उप संचालक कार्यलय,आरोग्य सेवा कोल्हापूर. सद्या रा. प्लॉट न.चार,सुनंदा पार्क, पोतदार हायस्कूल जवळ, कोल्हापूर. मुळ रा. कासारपुतळे, ता.राधानगरी, जि. कोल्हापूर)' वाहन चालक
विलास जिवनराव शिंदे, (वय -५७ वर्षे, चालक ग्रामीण रुग्णालय पारगाव, ता.हातकणंगले), पंटर शिवम विलास शिंदे, (वय - २२ वर्षे, रा. सरकारी हॉस्पिटल कॉलनी पारगाव, ता.हातकणंगले मुळ रा. किणी, ता.हातकणंगले,) अशी लाच घेणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
पोलीसांनी या कारवाईची माहिती दिली. तक्रारदार हे ५९ वर्षाचे असून य सेवानिवृत्तनंतर त्यांचे रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून सहाय्यक अधीक्षक वरुटे यांनी तक्रारदार यांचेकडे ३० हजार रुपये र लाच मागितली. तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली काल सोमवारी 29 रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली त्यानंतर आज मंगळवारी पोलिसांनी सापळा रचला. वरुटे याने तक्रारदाराबरोबर तडजोड करत तीस हजार रुपये ऐवजी २५ हजार रुपयाची लाच घेण्याची तयारी दाखवली. लाचेची २५ हजार रुपये लाचेची तडजोडीतील रक्कम संशयित चालक विलास शिंदे याला घेण्यास सांगितली. त्यानंतर चालक विलास शिंदे आणि पंटर शिवम शिंदे हे लाच रक्कम स्वीकारण्यास आले. त्यावेळी तक्रारदार यांचेकडून पंटर शिवम शिंदे याने लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर पोलिसांनी रंगेहात पकडले. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने,सुनिल घोसाळकर, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णु गुरव यांनी कारवाईत भाग घेतला.