+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule03 Mar 24 person by visibility 167 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : सोन्याची बाजारपेठ असलेल्या कोल्हापुरातील गुजरी येथून २५ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळालेल्या बंगाली कारागिराला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
 गुजरीमध्ये सोन्याचे दागिने घडविणाऱ्या सुबोजित घोडई आणि प्रल्हाद क्षेत्रपाल यांनी अंदाजे १५ लाख २० हजार किंमतीचे २५ तोळं सोने
घेवून पलायन केलं होतं. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी पश्‍चिम बंगाल इथं जाऊन यातील सुबोजित घोडई याला अटक केली. त्याला आज रविवारी गुजरी परिसरातून फिरवण्यात आले.
तीन ते ३० जानेवारी दरम्यान कोल्हापुरातील कासार गल्ली इथल्या एमबी गोल्ड नावाच्या सराफी दुकानातून प्रल्हाद क्षेत्रपाल आणि सुबोजित घोडई यांनी कामासाठी नेहमीप्रमाणं २५ तोळं सोनं घेतलं होतं. त्याचे दागिने बनवून घेतो असं सांगून ते निघून गेले. मात्र दुसर्‍याच दिवशी या दोघांनी पश्‍चिम बंगालकडं पलायन केल्याची चर्चा सराफी बाजारात सुरू झाली. त्यामुळं हवालदिल झालेल्या एमबीए गोल्डच्या मालकांनी या कामगारांचे प्रमुख सुमित प्रामाणिक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार प्रल्हाद क्षेत्रपाल आणि सुबोजित घोडई यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालं. पोलिस निरीक्षक प्रितम पुजारी आणि कर्मचार्‍यांनी पश्‍चिम बंगाल इथं जाऊन यापैकी सुबोजित घोडई याला अटक केली. त्याला न्यायालयानं पाच मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीय. त्याला आज जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताला तपासासाठी गुजरी आणि परिसरातून फिरवण्यात आले