नूतन मराठीचा विद्यार्थी गौरव पाटीलला राष्ट्रीय शालेय कुस्तीमध्ये सुवर्णपदक
schedule08 Dec 25 person by visibility 8 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचा विद्यार्थी पैलवान गौरव पाटीलने राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत गौरव पाटील याने ८० किलो ग्रीकोरोमन प्रकारामध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि बिहारच्या बलाढ्य मल्लांवर अचूक डावपेच, दमदार ताकद आणि निश्चयाच्या बळावर सलग विजय मिळवून गौरवने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय बेदरे, क्रीडा विभाग प्रमुख विनय शिंदे, जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील कुस्ती केंद्र कोपार्डेचा गौरव हा पैलवान आहे.