
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर: इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे विद्यामंदिर उजळाईवाडीच्या अध्यापिका रोहिणी किरण शिंदे यांना माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देण्यात आला.पोलीस उपअधिक्षक स्वाती गायकवाड, साहित्यिक डॉ.श्रीकांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रोटरी समाजसेवा केंद्रात हा समारंभ झाला.
शिंदे यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरे आयोजित करतात.यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सोनाली पटेल, संयोगिता महाजन ,मंजिरी देवाणकर, प्रिया मेंच, प्रियांका शिंदे, मंगल लिंगम, ऋतुराज शिंदे उपस्थित होते.