‘गोशिमा‘च्या अध्यक्षपदी श्रीकांत पोतनीस, उपाध्यक्षपदी मोहन पंडितराव
schedule08 Oct 20 person by visibility 642 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (गोशिमा) अध्यक्षपदी श्रीकांत पोतनीस तर उपाध्यक्षपदी मोहन पंडितराव यांची निवड झाली. राजीव परीख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
याप्रसंगी असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. ‘गोशिमा’च्या मानद सचिवपदी नितीनचंद्र दळवाई, खजिनदारपदी दीपक चोरगे यांची निवड झाली. असोसिएशनचे माजी अध्यक्ष सचिन शिरगावकर, संचालक अजित आजरी, लक्ष्मीदास पटेल, जे. आर. मोटवाणी, रणजित पाटील, संजय देशिंगे, सुनील शेळके, सुरजितसिंग पवार, स्वरुप कदम, प्रसाद गुळवणी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी मंडळाची निवड झाली.
………………