कष्ट इतकं शांततेत करा की यश धिंगाणा घातलं पाहिजे- भरत रसाळे
schedule02 May 25 person by visibility 129 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आईवडील आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी झटत असतात त्यामुळे मुलांनो "तुम्ही कष्ट इतकं शांततेत करा की यश धिंगाणा घातलं पाहिजे " असे प्रतिपादन खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे यांनी केले.
पतसंस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते . यावेळी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे सचिव वर्षाराणी वायदंडे व गोरख वातकर हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम झाला. चेअरमन मच्छिंद्र नाळे म्हणाले की, पतसंस्थेने असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत चालू वर्षी संस्थेने ३ कोटी ५ लाखावर नफा मिळविला. शासकीय स्कॉलरशिप परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांचा सराव व्हावा या उदात्त हेतूने पतसंस्था हा उपक्रम राबवत असते .या सराव परीक्षेचा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयोग होतो तसेच या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे आत्मबल वाढते. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून गुरुजनांचा आदर करून यश संपादन करावे.
सराव परीक्षेत सहेर मोमीन संस्कार विद्यालय शिये , विवेक चित्रकार तेजस मुक्त विद्यालय, अर्णव शिंदे तेजस मुक्त विद्यालय, प्रणील सरूडकर तेजस मुक्त विद्यालय , वेदांत चोपदार संस्कार विद्यालय शिये व विश्वजीत जगदाळे नूतन आदर्श विद्यालय या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, मेमोंट, पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. ही सराव परीक्षा पार पाडण्यासाठी गोरख वातकर, सागर पाटील, संतोष केसरकर यांचाही सन्मान करण्यात आला. संचालक शिवाजी सोनाळकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक महादेव डावरे यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक महादेव डावरे, शिवाजी भोसले, वसंत पाटील, साताप्पा कासार, सर्जेराव नाईक, अमित परीट, दशरथ कांबळे, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.