Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेस सोडलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवणार - आमदार सतेज पाटील अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफशिक्षक बँकेच्या मागील संचालकावरील सहा वर्षे अपात्रतेची कारवाई रद्द, जिल्हा उपनिबंधकांचा आदेशमनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवादगोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहणप्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी

जाहिरात

 

काँग्रेस सोडलेल्या माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवणार - आमदार सतेज पाटील

schedule17 Nov 25 person by visibility 75 categoryमहानगरपालिका

: महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात  गेले अशा माजी नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय सोडणार नाही. लवकरच त्यांचा कार्यक्रमही लावू" असा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला. कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. २०- सुर्वेनगर येथे सत्कार सोळावं काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते या मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील विजयकुमार कांबळे आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश  आमदार पाटील आणि माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत  पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, राहुल माने, इंद्रजीत बोंद्रे, धीरज पाटील, कळंबा ग्रामपंचायतच्या सरपंच सुमन गुरव, राजू साबळे, विलास आंबोळे, भीमराव देसाई, विलास बारड, अरुण पाटील, नंदकुमार भिसे, यशवंत शिंदे, सूर्यकांत पाटील- येवतीकर, आशिष पाटील, केरबा जाधव, युवराज तेली, गौरव सावंत, अभिजीत देठे, आर. डी. पाटील, श्रीमती जयश्री कांबळे, सुनील शिपुगडे, विजय गुजर, लखन चव्हाण, प्रवीण पाटील, प्रशांत पवार, नीता शिवराज पाटील, श्रीकांत मोरे, सतीश परके, अलका सनगर   उपस्थित होते. बोलताना आमदार पाटील यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले आरोग्य खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. लवकरच आरोग्यातील हा भ्रष्टाचार उघडकीस आणू. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्षाकडून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे अमिषा दाखविली जात आहेत परंतु मतदार त्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर ज्या माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष सोडला निवडणुकीत त्या नगरसेवकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर शहरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत थेट पाईपलाईनच्या माध्यमातून शहराला व उपनगरांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही मेळाव्यात मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकतीने  सामोरे जावे असे आवाहन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes