Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज धगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,

जाहिरात

 

प्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी

schedule13 Nov 25 person by visibility 920 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान. आधिविभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे समन्वयक प्रा. महेश सुर्याजीराव साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतर्फे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे.

प्रा. साळुंखे हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी  गजाननराव उर्फ एस. पी. साळुंखे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी “ इन इलॅस्टिक सेसमिक डिझाईन इन रेनफोर्सड काँक्रेट स्ट्रक्चर युजिंग रॅपिड प्लास्टिक मेथड (in - Elastic Seismic Design of Reinforced Concrete Structures Using Rapid Plastic Method) या विषयावर आपला प्रबंध सादर केला आहे. या प्रबंधाचे मार्गदर्शन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली येथील अप्लाइड मेकॅनिक्स विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस एन  तंडे यांनी केले आहे. प्रा. साळुंखे यांच्या संशोधनातील निष्कर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून, त्यांच्या संशोधनामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील भूकंपरोधक रचनांच्या डिझाईनविषयी नवे दृष्टीकोन उपलब्ध झाले आहेत.

ते सार्वजनिक बांधकाम विभाग,  जिल्हा परिषद, म्हाडा, एमआयडीसी, पोलिस हाउसिंग इत्यादी शासकीय विभागांसाठी स्ट्रक्चरल, थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिटर, आरसीसी डिझाईन व प्रूफ चेकिंग कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव , अधिविभागाचे  संचालक तसेच डॉ. के .टी. कृष्णास्वामी व डॉ. ए. बी. कुलकर्णी  त्यांचे त्यांना प्रोत्साहन  लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes