Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीरशैव बँकेच्या अध्यक्षपदी सतीश घाळी, उपाध्यक्षपदी वैभव सावर्डेकर कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !

जाहिरात

 

मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपद

schedule16 Nov 25 person by visibility 242 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  महानगरपालिकास्तर क्रिकेट स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर च्या १९ वर्षाखालील (मुले) क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले .येथील मेरी वेदर मैदान येथे या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये चाटे जूनियर कॉलेज, महावीर कॉलेज व  कॉमर्स कॉलेजचा पराभव करीत या स्पर्धेत विजेतेपद मिळविले. विजेत्या संघाची व खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,  संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सीईओ. कौस्तुभ गावडे  यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख व प्रशिक्षक  प्रा. संतोष कुंडले , प्रा. साद मुजावर, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. समीर पठाण, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व  सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes