भाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेका
schedule14 Nov 25 person by visibility 41 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयामुळे कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप कोल्हापूरच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेला जनतेने दिलेला कौल आहे. मत चोरीचा खोटा निगेटिव्ह पसरवणारे या निकालामुळे उघडे पडले आहेत. समाजातील सर्वात वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पक्षाचे ध्येय सातत्याने यशस्वी होत आहे, याचे हे द्योतक आहे. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांमध्ये मला देखील बिहार राज्यात निवडणुकीसाठी प्रचाराला जाता आले आणि आजचा या निकालाने मनस्वी आनंद होत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्रामध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंञी चंद्रकांत पाटील यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकांत विकासाचे पर्व वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी बिहार निकालाचा अश्वमेध महाराष्ट्रात देखील दिसेल. कोल्हापुरात महायुतीचा महापौर होण्यासाठी या निकालातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागावे असे सांगितले.
याप्रसंगी आमदार अमल महाडिक, विराज चिखलीकर, अमर साठे, धनश्री तोडकर, हेमंत आराध्ये, डॉ. राजवर्धन, भरत काळे, आप्पा लाड, हेमंत आराधे, विजय अग्रवाल, अजित सूर्यवंशी, गिरीश साळुंखे, अतुल चव्हाण, हेमंत कांदेकर, संतोष माळी, राजसिंह शेळके, धीरज पाटील, विशाल शिराळकर, रविकिरण गवळी, सुनील पाटील, विनय खोपडे, विश्वजीत पवार, माधुरी नकाते, अनिल कामत, महेश यादव, आजम जमादार, विजय खाडे, उमा इंगळे, किरण नकाते, विशाल शिराळे, अशोक लोहार, संगीता तांबे, अमित पसारे, संजय जासूद, सचिन सुराणा, किसन खोत, कौस्तुभ वाईकर, अवधूत भाटे, योगेश कांगठाणी, शितल तिरुके, रूपाली आगळे, जयेश घरपणकर, सुभाष रामुगडे, दत्तात्रय मसवेकर, भूषण कानकेकर, रोहित कारंडे, अजिंक्य जाधव, सचिन घाडगे, प्रशांत अवघडे, शाहरुख गडवाले, प्रणवती पाटील, सचिन आवळे, ओमकार गोसावी, अमेय भालकर, संग्रामसिंह जरग, राहुल घाडगे, संतोष माळी, शिवप्रसाद घोडके, विश्वास जाधव, उदय इंगळे, विवेक कोरडे आदी उपस्थित होते