Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफशिक्षक बँकेच्या मागील संचालकावरील सहा वर्षे अपात्रतेची कारवाई रद्द, जिल्हा उपनिबंधकांचा आदेशमनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवादगोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहणप्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजज दद

जाहिरात

 

अमूलला टक्कर द्यायचे असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढवा- मंत्री हसन मुश्रीफ

schedule16 Nov 25 person by visibility 20 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : " गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी आहे. म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल तर गोकुळचे दूध संकलन वाढलेच पाहिजे. २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करू. या उद्दिष्टासाठी गोकुळच्या विविध अनुदान योजना, वासरू संगोपन, केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा, जातिवंत म्हैस केंद्रे आणि लाडका सुपरवायझर योजना सुरू केल्या आहेत. "  असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व एनडीडीबी.डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर येथे उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन रविवारी करण्यात आले.  मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व  पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील,  गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “गोकुळने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे. त्याचा एक भाग म्हणून जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे. गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे.” गोकुळच्या या उपक्रमामुळे दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल.  आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातिवंत म्हैस खरेदी–विक्री केंद्र चालू केले आहे. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचे प्रमाण जास्त आहे. जातिवंत म्हैस खरेदीवर ३० टक्के अनुदान गोकुळ उत्पादकांना मिळते. आतापर्यंत १८ लाख ११ हजार लिटर दूध संकलन पार केले आहे.

 चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ व एन.डी.डी.बी यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होतील. यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळमार्फत ४० हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ दिले जाणार आहे. या म्हैस विक्री केंद्रामुळे खासकरून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल या तालुक्यातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी उपलब्ध होणार आहेत. ”
यावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक  मंगल खन्नुकर, कोवाड, वैभव बुगाडे, गिजवणे, गजेंद्र बिरंबोळे, मडिलगे, शिवाजी हूनगीनाळे बटकणंगले यांचा  सत्कार करण्यात आला. एनडीबीबीचे प्रतिनिधी डॉ.सरोज वाहणे यांनी स्वागत केले  संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी प्रास्ताविक केले.  संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी आभार  मानले. माजी माजी आमदार राजेश पाटील, संघाचे  ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,  किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.मोहम्मद तारिक, डॉ.बालाजी वडजे, के.डी.सी.सी.बँक संचालक सुधिर देसाई, माजी जि.प. सदस्य वसंत धुरे,  जिपचे माजी उपाध्यक्ष सतिश पाटील, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, संभाजी पाटील, एम.के.देसाई उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes