Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारी

जाहिरात

 

गोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहण

schedule14 Nov 25 person by visibility 442 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे ७२ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताहनिमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते ध्‍वजारोहण करण्यात आले तसेच सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६ व्या जयंतीनिमित्त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. चेअरमन  मुश्रीफ म्हणाले, “सहकारामुळेच ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना आधार मिळाला आहे. गोकुळने नेहमीच सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. पुढेही सेवा, सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकाराची ताकद वाढवत राहू.” 

 डॉ. एम. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.  डॉ.प्रकाश साळुंखे यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्‍ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे, डॉ.प्रकाश दळवी, महिला नेतृत्व विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes