खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शून्य टक्के व्याजदराने ई-बाइकचे वितरण
schedule23 Oct 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सभासद शिक्षकांसाठी विशेषत: शून्य टक्के व्याजदराने ई-बाईक वितरण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र सभासदांना बजाज चेतक येथे ई बाइकचे वितरण करण्यात आले. चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी सांगितले की, "वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार ही योजना सुरू केली आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे शिक्षक सभासदांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला असून, पर्यावरणपूरक आणि आधुनिकतेचा विचार करून ई-बाईकसारखा पर्याय निवडण्यात आला आहे. याप्रसंगी बजाज चेतकचे खासलीवाल, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कृष्णात चौगले, संचालक सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक, शिवाजी सोनाळकर ,वसंत पाटील, महादेव डावरे ,अमित परीट सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार, सभासद सर्वस्वी कृष्णात कुंभार, रेखा गुरव, विजय सातपुते, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.