Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुनर्विचार याचिकेसाठी सरकारवर वाढता दबाव, शिक्षक संघटना सरसावल्या ! मंत्री- आमदार –खासदारांना पत्रे !!टीईटीसंबंधी दोन दिवसात उच्चस्तरीय समितीची बैठक, धैयशील मानेंनी घेतली दादा भुसेंची भेटशिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची स्थापना ! अध्यक्षपदी डॉ. निखिल गायकवाड, उपाध्यक्षपदी सुजाता कुलकर्णी !!९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटीलबाजार समितीत शेतकऱ्यांसाठी मोफत जेवण ! शेतमालासाठी कोल्डस्टोरेज, व्यापाऱ्यांसाठी दुकाने गाळे !!वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा महोत्सवात चॅम्पियनशिवाजी विद्यापीठामध्ये ऑनलाईन एमबीए,  विद्यार्थ्यांच्या करियरसाठी सुवर्णसंधी दलित साहित्याने भारतीय साहित्याचा पैस वाढवला-डॉ. राजन गवसटीईटीचा विषय ऐरणीवर, शिक्षक संघाने घेतली खासदारांची भेटशिक्षकांच्याकडून तुळशीचा हार घालून धनंजय महाडिकांचा सत्कार

जाहिरात

 

वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा महोत्सवात चॅम्पियन

schedule14 Sep 25 person by visibility 83 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  : शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे गेले दोन दिवस रंगलेल्या विभागीय युवा महोत्सवाची  रंगतदार सांगता झाली. विविध कलाप्रकार, सर्जनशीलता आणि उत्साहाच्या बहारदार मेजवानीतून ‘शहीद’च्या रंगमंचावर संस्कृतीचे इंद्रधनुष्य फुलले.

अकरा महाविद्यालयांच्या चुरशीच्या स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप पटकावून इतिहास रचला.  उपविजेतेपद पुण्यातील एसएनडीटी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमनने मिळवले. विजेत्यांचा गौरव डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर, एसएनडीटी सांस्कृतिक समन्वयक किरण गायकवाड, डीवायएसपी सुवर्णा पत्की व पीएसआय स्वाती यादव यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई सिताराम पाटील होत्या. महोत्सवात साडेतीनशेहून अधिक विद्यार्थिनींनी तब्बल 26 कला प्रकारांतून आपल्या कला सादर केल्या. लिटरेचर, थिएटर आणि डान्स या कलाप्रकारात ‘शहीद’ने  चॅम्पियनशिप पटकावत वर्चस्व सिद्ध केले. म्युझिक इव्हेंटमध्ये पीजीएसआर कॉलेज, पुणे, तर फाइन आर्ट्समध्ये एम. के. एस. एस. कॉलेज, रत्नागिरी विजयी ठरले.

समन्वयनाची धुरा डॉ. नितीन प्रभू तेंडुलकर व किरण गायकवाड यांनी सांभाळली. शहीद महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून प्रा. अविनाश पालकर यांनी प्रभावी जबाबदारी पार पाडली. डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सांस्कृतिक सोहळा झाला. प्राचार्य  प्रशांत पालकर यांनी प्रस्ताविक केले. प्रा. शुभांगी भारमल व  प्रा. तेजस्विनी परबकर यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले.उपप्राचार्य सागर शेटगे, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उत्साही विद्यार्थिनींच्या उपस्थितीने महोत्सव संस्मरणीय ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes