९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटील
schedule14 Sep 25 person by visibility 178 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठीतील ख्यातनाम आणि लोकप्रिय साहित्यिक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची रविवारी १४ सप्टेंबर २०२५) बैठक झाली. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाटील यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती दिली.
सातारा येथील शाहू स्टेडियम येथे एक ते चार जानेवारी २०२६ या कालावधीत साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिष्द शाहुपरी शाखा आणि मावळा फौंडेशनने या संमेलनाचे आयाजन केल आहे. दरम्यान साहित्यिक पाटील हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील आाहेत. . त्यांचा जन्म, २८ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. ते मराठीतील ख्यातनाम लेखक आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय विषयावरील कादंबऱ्या लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या झाडाझडती कादंबरी खूप गाजली. झाडाझडती कादंबरीला १९९२ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. चंद्रमुखी, पांगिरा आणि महानायक या कादंबऱ्याची हिंदी भाषातंरे झाली आहेत.छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संभाजी कादंबरी लिहिली. शिवाय त्यांचे नाटक, अनुवादित संग्रह, कथासंग्रह, चरित्रे, लेख संग्रह प्रकाशति आहेत. पानिपत कादंबरीनंतर त्यांनी याच विषयावर रणांगण नाटक लिहिले. हे नाटक प्रचंड गाजले. त्यांच्या साहित्यकृती या नेहमीच बेस्ट सेलर ठरल्या आहेत.
दरम्यान सातारा येथी मराठी साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवडीसाठी साहित्य महामंडळाचे अध्यकक्ष प्रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे साहित्य महामंडळाची बैठक झाली. बैठकीला उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोर, रामचंद्र काळुंखे, देविदास फुलार, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.