Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीमध्ये डिजिटल फाऊंड्रीविषय तीन दिवसीय कार्यशाळा

schedule15 Aug 25 person by visibility 44 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीमधील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागास आणि एआयसीटीईकडून वाणी प्रकल्पासाठी मिळालेल्या मंजुरीतून १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत "डिजिटल फाऊंड्री: आयओटी, रोबोटिक्स व ऑटोमेशन यांचे एकत्रीकरण" या विषयावर  कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. व्हायब्रंट ॲडव्होकसी फॉर ॲडव्हान्समेंट अँड नर्चरींग ऑफ  इंडियन लॅंग्वेजेस ही अखिल भारतीय शिक्षण परिषदेने सुरू केलेली एक योजना आहे. 
ही कार्यशाळा पूर्णपणे मराठी भाषेत होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून प्रगत तांत्रिक माहिती उपलब्ध करून देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. असे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी सांगितले. या कार्यशाळेत मयुरा स्टील्सचे चंद्रशेखर डोली, मौर्या इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश पाटील, घाडगे-पाटील इंडस्ट्रीजचे संचालक आदित्य पाटील राहुल पाटील (अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाऊंड्रीमन  कोल्हापूर विभागचे अध्यक्ष राहुल पाटील, डॉ. एस. एस. मोहिते व डॉ. एस. एस. ओहोळ, सीमेन्स डिजिटल इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर, पुणेचे मोईन सिद्दीकी,, प्रा. शैलेश शिरगुप्पीकर (आरआयटी, सांगली), सी. पी. महाजन (सीईओ, डॉल्फिन लॅब, पुणे) हे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक फाउंड्री इंडस्ट्रीज मधील प्रॅक्टिशनर सहभागी होणार आहेत.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे, अध्यक्ष, डॉ. विनय कोरे, कुलगुरू  डॉ. डी. टी. शिर्के यांनी कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.  डीन डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने, विभागप्रमुख डॉ. पी. व्ही . मुळीक आणि  अकॅडेमिक को-ओर्डीनेटर   प्रा. जी. एस. कांबळे यांचे सहकार्य लाभत आहे.  या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून डॉ. मुकुंद धुत्तरगांव आणि सह-समन्वयक म्हणून डॉ. एस. व्ही. लिंगराजू हे काम पाहत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes