Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लोकांच्या चाळीस वर्षाच्या लढयाला यश ! कोल्हापुरात सर्किट बेंच !!मुश्रीफ म्हणाले, बापाचा संकल्प पोरांनी पूर्ण करावा ! कागलवर घसरले नाहीत म्हणून केपींचे आभार !!भैया मानेंच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर, मेळाव्यात विक्रमी मतदार नोंदणीचा संकल्प !राहुल पाटलांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, सतेज पाटलांनी मनाला लावून न घेता सहकार्य करावंएनडीडीबीच्या चेअरमनांनी केले गोकुळचे कौतुक, भविष्यातही सहकार्याची ग्वाहीवाडी-वस्तीवरील शाळा फुलविणारा शिक्षक ! शालेय परिसराचा झाला कायापालट !!पीएन पुत्रांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची तारीख ठरली ! राहुल-राजेश पाटलांची मुंबईत अजित पवारांशी भेट !!महादेवी हत्तीणसाठी महाडिक भेटले केंद्रीय मंत्र्यांना, शेट्टींची रविवारी पदयात्रा ! सतेज पाटील देणार राष्ट्रपतींना निवेदन !!महादेवी गुजरातमध्ये पोहोचली, मग आमदार-खासदारांना जाग आली ! बैल गेला नि झोपा केला असा प्रकार !!कोल्हापूर अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांना सहा टक्के पगारवाढ

जाहिरात

 

वाडी-वस्तीवरील शाळा फुलविणारा शिक्षक ! शालेय परिसराचा झाला कायापालट !!

schedule01 Aug 25 person by visibility 234 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुगम भागात बदली पाहिजे, शहरी भागात राहायला हवे. मोठया पटसंख्येच्या शाळेतच नोकरी करायची यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू असताना दुसरीकडे एक शिक्षक वाडी-वस्तीवरील शाळा स्वीकारतो. सुविधांचा अभाव असलेल्या परिसरात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करतो. कधी पदरमोड करुन तर कधी लोकांच्या सहभागातून शाळा परिसराचा कायापालट करतो. भौतिक सुविधांनी शाळा परिपूर्ण करताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवितो. डिजीटल क्लासरुमची निर्मिती करतो, विद्यार्थ्यासाठी हँडवॉश स्टेशन आणि शूज स्टँड उभारतो. परसबाग तयार करत पर्यावरण विषयक धडे देतो एक व्रत म्हणून काम करणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे, सतीश पंडित पाटील आणि त्यांनी ही किमया घडविली आहे, विद्यामंदिर भैरेवाडी वस्तीशाळेत.

कागल तालुक्यातील भैरेवाडी, साधारणपणे ३५० लोकवस्तीची वाडी. सावर्डेब्रुदुक पासून काही किलोमीटर अंतरावर. भैरेवाडीतील सगळा समाज कष्टकरी. २००१ मध्ये येथे वस्तीशाळा सुरू झाली. २०१० मध्ये ही वस्तीशाळा नियमित झाली. येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. ही शाळा द्विशिक्षकी. शिक्षक सतीश पाटील हे २०१४ मध्ये येथे रुजू झाले. पाटील हे साके गावचे. आपशी बदलींद्वारे त्यांची सांगली जिल्ह्यातील तासगाव येथून येथे बदली झाली. ते ज्या वेळी रुजू झाले त्यावेळी शाळेचा पट हा चौदा-पंधरा विद्यार्थ्यापुरता मर्यादित. विद्यार्थी संख्या कमी, सुविधांचा अभाव. शालेय परिसर हा केवळ चार गुंठयांचा. या ठिकाणी काम करताना शिक्षक पाटील यांनी नियोजन, नाविन्यपूर्णता आणि समर्पणचा मिलाफ घडवित काम केले. विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. टप्प्याटप्प्याने शाळेत बदल केला. डिजीटल क्लासरुम केले. विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी शूज स्टँड, हँड वॉश स्टेशन, तरंग वाचनालय, परसबाग निर्मिती केली. टाकावूपासून टिकावूची निर्मिती या सूत्राचा अवलंब करत प्लास्टिक बाटल्या, लाकडी ट्रेचा वापर करत शालोपयोगी वस्तू बनविल्या. परिसर स्वच्छ ठेवला. विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य, नीटनेकटपणा रुजविला. वाडी-वस्तीवरील लोकांनी साथ दिली. चौदा-पंधरा विद्यार्थी पटावरील ही शाळा ३२ पटापर्यत वाढली.  या साऱ्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकारी शिक्षिका विजयालक्ष्मी मोरे यांचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले.

‘डॉ. जे. पी. नाईक समृद्ध शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा-समृद्ध शाळा’ अभियानमध्ये क्रमांक पटकाविले. प्रशासनातील अधिकाऱ्यांची साथ मिळाली. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी शाळेच्या विकासाचा आलेख मसुरी येथील आयएएस ट्रेनिंग सेंटर’मध्ये साऱ्यांच्यासमोर मांडला. जिल्हा परिषदेत ‘कॉफी विथ सीईओ’सोबतचा मान दिला. हे कौतुकाचे प्रसंग अविस्मरणीय आहेत.’अशा भावना शिक्षक सतीश पाटील यांनी केले.

शालेय परिसरात परसबाग फुलविला आहे. शेवग्याची रोप लागवड केली आहे. शालेय पोषण आहारात लागवड केलेल्या शेवग्याच्या झाडांच्या शेंगा वापरतात. प्रत्येक शाळेत शेवग्याच्या रोपांची लागवड व्हावी याकरिता आसपासच्या शाळेला रोपे भेट दिली आहेत. उलटा अशोका या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. जवळपास तीन हजार रोपे वाटपाचे नियोजन आहे. शालेय उन्नतीच्या या विविध उपक्रमासाठी सध्याचे सीईओ कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे, केंद्रप्रमुख सी. आर. चौगुले, सावर्डे बुद्रुक विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक सुनील पाटील, कसबा सांगाव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक बाळासाहेब निंबाळकर यांनी प्रोत्साहित केले. अन्य शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे सहकार्य मोलाचे ठरले. नुकतेच शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी कागल तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत शिक्षक पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली. शिक्षक पाटील हे आता वाडी-वस्तीवरील विद्यार्थी तंत्रस्नेही असला पाहिजे, कम्प्युटराचे ज्ञान, तंत्रकौशल्ये आत्मसात करायला हवीत यासाठी डिजीटल वर्ग संकल्पनेला अनुसरुन डिजीटल विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes