उत्तरेश्वर पेठेतील भाजपच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग
schedule01 Apr 22 person by visibility 1192 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : भागाभागात काढलेल्या रांगोळ्या, विजयाच्या घोषणा आणि मतदारांचा वाढता प्रतिसाद अशा वातावरणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उत्तरेश्वर पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
वाघाची तालीम येथून पदयात्रेला सुरुवात झाली. जयविजय तरुण मंडळ, मस्कुती तलाव, जगदगुरु मठ, आखरी रास्ता रोड, उत्तरेश्वर चौक, गवत अड्डा, भाविका विठोबा मंदिर, स्वरुप हॉस्पिटल, विकास हायस्कूल, रंकाळा बसस्थानक परिसर, ताराबाई रोड, गंगावेश, रेगे तिकटी अशी मिरवणूक काढण्यात आली.माजी खासदार धनंजय महाडिक, उमेदवार सत्यजित कदम यांनी नागरिकांना भाजपला मतदान करुन निवडून देण्याविषयी आवाहन केले. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढल्या होत्या.जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, सत्यजित कदम तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भाजपाचा विजय असो अशा घोषणा देत पदयात्रा पार पडली. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक किरण शिराळे, विजय खाडे, भरत काळे, नाना आयरेकर, दीपक काटकर, महेश नलवडे, मानसिंग सावंत, योगेश येळगावकर, रमेश साळोखे, संजय माळी, बंडोपंत साळोखे, अमोल पालोजी, संदीप कुंभार, दिगविजय कालेकर, राजेंद्र कुंभार, साथऺक खटावकर, विद्या बनछोडे, संध्या तेली, विद्या बागडी, संगिता चव्हाण, सुनिता सुर्यवंशी आदींचा समावेश होता.