इरिगेशन फेडरेशनच्या अध्यक्षपदी विक्रांत पाटील, उपाध्यक्षपदी सुभाष शहापुरे
schedule27 Apr 25 person by visibility 69 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या अध्यक्षपदी विक्रांत पाटील-किणीकर, उपाध्यक्षपदी सुभाष शहापुरे (बुबनाळ) यांची निवड झाली. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यानंतर पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी किणीकर यांचे नाव संचालक संजय पाटील (खुपिरे) यांनी सुचविले. संचालक सचिन जमदाडे (माले) यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शहापुरे यांचे नाव संचालक एस. ए. कुलकर्णी (वारणानगर) यांनी सुचविले. त्यास संचालक चंद्रकांत पाटील (पाडळी) यांनी अनुमोदन दिले. अन्य संचालकामध्ये दत्तात्रय उगले (मडिलगे बुद्रुक), रणजीत जाधव (घुणकी), संजय चौगुले (उदगाव), विक्रमसिंह माने (कसबा सांगाव), इंद्रजीत पाटील (पारगाव) यांचा समावेश आहे. निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष किणीकर व उपाध्यक्ष शहापुरे यांनी, ‘ संचालक मंडळाच्या सहकार्याने सरकारी उपसा जलसिंचन योजनांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच शेती पंपावरील वीज दरवाढ, सरकारी पाणीपट्टी दरवाढ, जलमापक यंत्रविरोधी लढा देऊ.’असे सांगितले. सचिव मारुती पाटील यांनी आभार मानले.