एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या ४७ व्या राज्यव्यापी अधिवेशनचे थाटात उद्घाटन
schedule26 Apr 25 person by visibility 85 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील वीज क्षेत्राच्या प्रगतीत अतांत्रिक अधिकाऱ्यांचेही योगदान मोलाच राहिले आहे. महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीनही कंपनीतील अतांत्रिक अधिकारी यांचे काम हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व दाखवण्यास सुरवात केली आहे. त्याची भविष्यातील निकड लक्षात घेत वीज क्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यानी त्याच्याशी जुळवून घ्यावे लागेल, असे मत कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात होत असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या ४७ व्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य अथिति म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर महापारेषणचे मुख्य औद्योगिक सबंध अधिकारी भारत पाटील, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस संजय खाडे, संघटन सचिव विजय गुळदगड, अधिकारी संघटनेच्या कोल्हापूर परिमंडलाचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील व सचिव श्रीकांत सणगर उपस्थित होते.
संघटनेचे माजी पदाधिकारी गुलाब मानकर व एस.वाय.पाटील यांचा संघटनेतील दीर्घ योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनिमित्त अनिल बराटे, प्रवीण बागुल, आनंदा गुजर, सुनील पाटील, मनोज ठावरे, मनोज भोकरे, संभाजी पाटील, राधेश्याम विखे, तानाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ खेळाडू संदीप बागुल, राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू नितीन सावर्डेकर व नितीन नांदुरकर यांचाही विशेष सन्मान झाला.
आप्पासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस संजय खाडे यांनी संघटनेचा आढावा मांडला. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले श्रीकांत सनगर यांनी आभार मानले. या अधिवेशनास महापारेषणचे महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने व अभिजित सिकनिस यांच्यासह महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सूत्रधारी कंपनीतील वर्ग 1 आणि वर्ग दोनचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.