जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतींना सूचना, पिण्याच्या पाण्याचे दैनंदिन शुद्धिकरण करा
schedule27 Apr 25 person by visibility 63 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतींना पाणी शुद्धिकरणावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. साथीच्या रोगांबाबत खबरदारी घ्यावी असेही म्हटले आहे. उन्हाळयात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईची समस्या उद्भवू शकते. अशा प्रसंगी पाणी शुद्धिकरणाकडे लक्ष द्यावे. कॉलरा, कावीळ, विषमज्वर, गॅस्ट्रो, अतिसार अशा जलजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने खबरदारी घ्यावी.सार्वजनिक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे साठे निर्जंतुक व पिण्यास योग्य राहतील याकडे लक्ष द्यावे. ग्रामपंचायकडील जलसुरक्षकांमार्फत पिण्याच्या पाण्याचे दैनंदिन शुद्धिकरण करा. ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया होण्यासाठी किमान अर्धा तासाचा अवधी देण्याची जलसुरक्षकांना सूचना करावी. पाणी नमुने नियमितपणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवावेत, जलवाहिन्यांची गळती तातडीने काढावी असेही कळविले आहे.