शिवाजी पेठ -मंगळवार पेठेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका ! हजारो मतदार सहभागी, पदयात्रेने वातावरण निर्मिती !!
schedule07 Jan 26 person by visibility 105 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची हवा दिवसेंदिवस तापत आहे. प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारानी भेटीगाठी, पदयात्रा, कॉर्नर सभा याद्वारे अधिकाधिक मतदारांच्या पर्यंत उमेदवारी पोहोचवत आहेत. दरम्यान बुधवारी, सात जानेवारी 2026 रोजी प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीच्या उमेदवाराने प्रचाराचा धडाका लावला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निघालेल्या या पदयात्रेमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले. महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत टिंबर मार्केट, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ या भागातून पदयात्रा निघाली.
प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत चंद्रकांत जाधव, भाजपच्या उमेदवार माधुरी किरण नकाते, निलांबरी साळोखे, आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार यशोदा प्रकाश मोहिते यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा काढण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पदयात्रेमध्ये सहभागी होऊन महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताने निवडून द्या असे आवाहन मतदारांना केले. टिंबर मार्केट येथील राजाराम चौक येथून या पदयाला सुरुवात झाली. हलगीचा कडकडाट, महायुतीच्या विजयाच्या घोषणा आणि उमेदवारांचा जयघोष ही पदयात्रा फिरंगाई हॉस्पिटल, फिरंगाई तालीम परिसर, शिवाजी पेठ न्यू महाद्वार रोड, लाड चौक, शाहू बँक परिसर आणि मंगळवार पेठ भागातून निघाली. महायुतीच्या चारही उमेदवारानी मतदारांना अभिवादन करत विजयी करण्याचे आवाहन केले. या पदयात्रेमध्ये महिलांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत नागरिकांनी मार्ग दणाणून सोडला. खासदार महाडिक पदयात्रेत सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. दरम्यान खासदार महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रेला सुरुवात झाली.पदयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी अमर जरग, राजेंद्र नरके, दशरथ कांबळे, स्वप्नील पाथरुट, ओंकार पाटील, रवी पाटील, जयसिंग चौगुले, संदीप सोनाळे यांच्यासह महायुतीमधील पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते