रामानंदनगर-जरगनगरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका
schedule08 Jan 26 person by visibility 296 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सर्वच उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. मतदारांशी संपर्क साधला जात आहे. गुरुवारी, आठ जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांचा रामानंदनगर-जरगनगरात प्रचाराचा धडाका पाहावयास मिळाला. महायुतीच्या विजयाच्या घोषणा, मतदारांना अभिवादन करणारे उमेदवार, आणि प्रचारफेरीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद असे चित्र होते.
महायुती अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल चिकोडे, विजयसिंह खाडे, रेणू माने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मानसी लोळगे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. चारही उमेदवार या फेरीत सहभागी होते. रामानंदगर येथील मारुती मंदिर, कलावती मंदिर येथे दर्शन घेऊन फेरीला सुरुवात झाली. जरगनगर ले आऊट एक, दोन, तीन, चार या परिसरातून रॅली निघाली. या रॅलीमध्ये अमृत काशीद, सत्यजीत सावंत, सचिन साळोखे, दीपक चव्हाण, अमोल कदम, गणेश सांगडे, शंभूराजे हिरेमठ, अजित राठोड, दादू केंगाळे, हर्षांक हरळीकर यांच्यासह परिसरातील पुरुष व महिलांची संख्या लक्षणीय होती. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती.