सदर बाजार - विचारेमाळ परिसरात महायुतीच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule08 Jan 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी 7 जानेवारी 2026 रोजी सदर बाजार विचारे माळ परिसरात काढलेल्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पदयात्रेत सहभागी होत मतदारांना महाविद्यालयात निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक चार मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही रॅली निघाली. कें द्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामाच्या जोरावर कोल्हापूर शहर विकासात अग्रेसर आहे. ह शहरातील प्रत्येक भागाला परिपूर्ण निधी देऊन नागरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे या निमित्ताने सांगून ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पाठबळ देऊन शहराच्या तिसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले, तीच साथ कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना देऊन त्यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, माजी महापौर सुनिल कदम, महायुतीचे उमेदवार दिलीप पोवार, संजय निकम, स्मिता माने, शुभांगी भोसले, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, मारुती माने ,शिवसेना महानगर समन्वयक श कमलाकर जगदाळे, उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, राज जाधव,श राजेंद्र ढाले, रमेश भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी भागातील नागरिक उपस्थित होते.