वारसदार अण्णांचा…वारसा समाजकार्याचा ! !
schedule08 Jan 26 person by visibility 76 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव…! यांचे नाव उच्चारलं की, चटकन डोळयासमोर उभं राहतं ते, लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी. शहर विकासाचे नेमके व्हिजन असलेला आमदार…क्रीडा, औद्योगिक, सामाजिक क्षेत्रासाठी सतत धडपडणारे व्यक्तिमत्व…कोरोना काळात त्यांनी लोकांना मिळवून दिलेल्या आरोग्य सुविधा...आजही लोकांच्या स्मरणात आहे. अण्णा या नावांनी ते शहरभर परिचित. त्यांच्या समाजकार्याचा वारसा तितक्याच ताकतीने पुढे चालविणारे तरुण नेतृत्व म्हणजे, सत्यजीत चंद्रकांत जाधव.
युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्या सोबतच विविध क्षेत्रात ते सक्रिय आहेत. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांच्या कार्याचा चालविताना त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोल्हापुरातील समाज व राजकारणातील तरुण आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधून सर्वसाधारण गटातून ते निवडणूक लढवित आहेत. सत्यजीत जाधव यांना सामाजिक कार्याची आवड आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्राशी निगडीत आहेत. विविध क्रीडा संघटनांशी निगडीत आहेत. प्रभागाच्या विकासासोबतच शहराची चौफेर प्रगती हा उद्देश ठेवून ते राजकारणात काम करत आहेत. प्रभागातील त्यांच्या संपर्कफेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठया संख्येने मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील महायुतीच्या उमेदवारांया प्रचारार्थ ठिकठिकाणी संपर्क साधत आहेत.