लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावर महायुतीची महापालिकेत सत्तेवर येणार - सत्यजीत कदम
schedule08 Jan 26 person by visibility 43 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘महायुती सरकारने जनतेला केंद्रस्थानी ठेवून विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या. सरकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर लोकांचा विश्वास आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून बहिणींना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादावर महापालिकेतही महायुतीची सत्ता येणार,’असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम यांनी व्यकक्त केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेचे उमेदवार अनिल अधिक, समीर सदाशिव यवलुजे, भाजपच्या उमेदवार मनाली धीरज पाटील, पल्लवी निलेश देसाई यांच्या प्रचारार्थ त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. माजी महापौर सुनील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी बोलताना सत्यजीत कदम यांनी महायुतीच्या माध्यमातून शहरातील प्रस्तावित विकास कामांची माहिती दिली. दरम्यान प्रभागातील राजदत्त कॉलनी, लाइनबझार येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. उमेदवारांच्या प्रचारफेरीला प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.