शाहू स्टेडियमवर बुधवारपासून अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार
schedule15 Apr 25 person by visibility 90 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारपासून (१६ एप्रिल २०२५) अटल चषक २०२५ फुटबॉल स्पर्धा होत आहे. तटाकडील तालीम मंडळातर्फे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील शाहू स्टेडियम येथे स्पर्धा होणार आहे. अशी माहिती संयोजक गणेश देसाई व राजू जाधव यांनी दिली.
अटल चषक स्पर्धा केएसएच्या नियमानुसार होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर बुधवारी सकाळी ८ वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरूध्द संध्यामठ तरुण मंडळ हा सामना होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात चार वाजता दिलबहार तालीम मंडळ विरूध्द प्रॅक्टीस फुटबॉल क्लब हा सामना होईल. या सामन्यावेळी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होऊन स्पर्धेला प्रारंभ होईल. अंतिम सामना २७ एप्रिल रोजी होईल. स्पर्धेदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख व अटल चषक तर उपविजेत्या संघाला ७५ हजार व अटल चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीरसह उत्कृष्ट फॉरवर्ड, उत्कृष्ट हाफ, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट गोलकीपर यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच दररोज होणाऱ्या सामन्यातील सामनवीर व लढवय्या खेळाडू यांनाही बक्षीस दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेला अशोक देसाई, विश्वजीत साळोखे, संतोष भिवटे उपस्थित होते.