Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफजिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफस्थानिक स्वराज्यच्या निवडणुका महायुतीद्वारे ! सहकारी संस्थेत सारे एकत्र !! हसन मुश्रीफधर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात - पालकमंत्री प्रकाश आबिटकर संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !!

जाहिरात

 

विवेकानंद शिक्षण संस्था –एनआयआयटी फाऊंडेशनमध्ये सामज्यंस करार

schedule16 Apr 25 person by visibility 45 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कौशल्य विकास, संशोधन क्षेत्राला चालना आणि रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर आणि एन आय आय टी फाउंडेशन, नवी दिल्ली यांच्यात परस्पर सहकार्याचा सामंजस्य करार करण्यात आला. विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे सचिव प्राचार्या शुभांगी गावडे आणि एन आय आय टी फाउंडेशनतर्फे दिपक कुमार त्रिवेदी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्रिवेदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा आराखडा सादर केला.

 आयबीएम स्किल्स - बिल्ड प्लॅटफॉर्मद्वारे तरुणांना कौशल्य, निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासासाठी नवीन अभ्यासक्रमांच्या निर्मितीची निरंतर प्रक्रिया राबवणे ही या सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये आहेत. कराराच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये आवश्यक  विविध तांत्रिक कौशल्ये तसेच सायबर सिक्युरिटी, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा अनॅलिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्यामुळे विविध कौशल्यांनी युक्त युवक वर्गाची निर्मिती झाल्याने स्पर्धात्मक क्षमता उच्च दर्जाची होईल आणि बेरोजगारी कमी करण्यास सहाय्य होईल. 

याप्रसंगी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव, दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज इचलकरंजी, राजे रामराव महाविद्यालय जत, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मिरज, सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर, दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज इचलकरंजी, डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांनी महाविद्यालयीन स्तरावरील सामंजस्य करार केले.  संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे म्हणाल्या, कौशल्यपूर्ण युवकच आत्मविश्वासपूर्ण असतो. ज्ञान आणि कौशल्यनिर्मिती ही निरंतर प्रक्रिया असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी नेहमी जागरूक असावे. 

 संस्थेच्या अर्थ विभागाचे सहसचिव प्राचार्य एम एस हूजरे यांनी शालेय जीवनापासूनच कौशल्य विकास महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे करारासाठी मार्गदर्शन लाभले.  संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या धाराशिव विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉ. जे. एस. देशमुख, डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, प्राचार्य डॉ. एस एस मणेर, आर के भडके, प्रा. डॉ. के  कांबळे, प्रा. सी एस बागडी, विभागप्रमुख, विद्यार्थी, उपस्थित होते.  प्रा. सुदर्शन महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक प्रा. विराज जाधव यांनी नियोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes