Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफजिल्ह्यातील साखर कारखान्यांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार- हसन मुश्रीफस्थानिक स्वराज्यच्या निवडणुका महायुतीद्वारे ! सहकारी संस्थेत सारे एकत्र !! हसन मुश्रीफधर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात - पालकमंत्री प्रकाश आबिटकर संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !!

जाहिरात

 

संवेदनशीलतेच्या सावलीत उमललं नातं…! सत्यशोधकी पद्धतीने विवाह सोहळा !!

schedule15 Apr 25 person by visibility 194 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनिल कांबळे आणि स्नेहा चौधरी. दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत. अनिल कांबळे हे शाहूवाडी तालुक्यात नोकरीला. तालुक्यातील दुसऱ्या शाळेत स्नेहा चौधरी शिक्षिका. चौधरी या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील. कोल्हापूरपासून शेकडो मैल अंतर. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या सहजीवनाला सुरुवात झाली. सत्यशोधकी पद्धतीने विवाह विधीवत पार पडला. तो ही शून्य खर्चात. आणि हा सारा सोहळा घडवून आणला शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी. त्यांच्या पुढाकारातून हा सोहळा बालकांचा अनाथाश्रम असलेल्या करुणालय बालगृह येथे झाला. संवेदनशीलतेच्या सावलीत नवं नातं उमललं.

गटशिक्षणाधिकारी सुतार व त्यांच्या पत्नी वैशाली सुतार यांनी वधू स्नेहा चौधरीचे पालकत्व निभावलं.  स्वतःच्या घरातून वधूला तयार करून
मोजक्या व्हराडासोबत चारचाकी वाहनातून घरापासून २५ किमी अंतरावरील कार्यालयात घेऊन आले. गटशिक्षणाधिकारी डॉ. सुतार यांनी वाहनाचे सारथ्य केले. एक अधिकारी किती संवेदनशील असू शकतो याचे दर्शन यानिमित्ताने घडले. चंद्रपूरहून आलेल्या मुलीला एकटेपणा जाणवू नये म्हणून तिचे आईवडील बनून भक्कम आधार दिला. या अनोख्या विवाह सोहळयात व्हराडी बनले होते, प्राचार्य डॉ.जी.पी.माळी आणि डॉ.प्रविण चौगले. दोघेही संवेदनशील मनाचे. शिक्षकी पेशामध्ये वेगळी ओळख निर्माण केलेले. दोघेही समाजभान” समूहातील सदस्यही आहेत.

या विवाह सोहळयात एका संवेदनशील वृत्तीच्या अधिकाऱ्याचे अनोखे दर्शन घडले. खरं तर, गटशिक्षणाधिकारी म्हणजे शाळांची देखरेख, शिक्षकांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे. मात्र नोकरीच्या पलीकडे जाऊन सुतार यांनी शिक्षकवर्गांशी एक बंधुत्वाचं, मार्गदर्शकाचं नातं निर्माण केले आहं. शिक्षकांच्या अडचणी दूर करणं, वैयक्तिक जीवनातील काही समस्या जाणून घेणे,  त्याची सोडवणूक करणं यासाठी ते प्रयत्नशील असतात. अधिकारी म्हणून रुबाब मारणारे नव्हे तर, जीव जोडणारं व्यक्तिमत्व. त्यांनी, या त्यांनी या विवाहाला केवळ संमतीच दिली नाही तर हा विवाह घडवून आणण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. मंगलकार्य घडवून आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी नियोजित वधू आणि वर यांच्यात डोळसपणे चर्चा घडवून आणली. विवाह करण्याचे ठरविले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला जयंती. यादिनी ‘समता आणि विवेक’ यांच्या साक्षीने विवाह घडवून आणला. बालकांचे अनाथाश्रम असलेल्या करुणालय बालगृह येथे हा विवाह सोहळा झाला. नव्याने शिक्षक बनलेल्या जोडीस खर्चाची तोशीस लागू नये याची काळजी घेतली. म्हणून विवाह शून्य खर्चात करायचं ठरलं. सत्यशोधकी पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव कृष्णात कोरे व सुतार पती-पत्नी यांनी पौराहित्य केले. प्राचार्य माळी यांनी नव्या दांपत्याला आशीर्वाद दिले. सध्याच्या महागाईच्या काळात अतिशय कमी खर्चात विवाहाचा हा आनंदसोहळा साजरा करता येतो याचा वस्तुपाठ !

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes