प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे
schedule15 Apr 25 person by visibility 426 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी तर उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे यांची निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी 15 एप्रिल रोजी बैठक झाली. यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. मेढे यांची दुसऱ्यांदा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सहाय्यक निबंधक सीएम इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. नूतन अध्यक्ष कोळी व उपाध्यक्ष मेढे हे दोघेही पदाधिकारी करवीर तालुक्यातील आहेत. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान अध्यक्षपदासाठी कोळी यांचे नाव संचालक शिवाजी बोलके यांनी सुचवले तर संचालक नंदकुमार वाईंगडे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी मेढे यांचे नाव संचालक बाळासाहेब निंबाळकर यांनी सुचवले तर संचालक अमर वरोटे यांनी त्यास अनुमोदन दिले. बैठकीस मावळते अध्यक्ष बाळकृष्ण हळदकर, उपाध्यक्ष रामदास झेंडे, संचालक राजेंद्र पाटील, अर्जुन पाटील, सुनील एडके, एस व्ही पाटील, शिवाजी रोडे पाटील, गौतम वर्धन, गजानन कांबळे, बाबू परीट, वर्षा केनवडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या निमित्ताने सुकाणू समितीचे ज्योतीराम पाटील, रवीकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, कृष्णात कारंडे, रघुनाथ खोत, बी एस पोवार, प्रकाश खोत, संजय कुरडूकर आदी उपस्थित होते.