कोल्हापूरच्या सात जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
schedule15 Apr 25 person by visibility 133 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २०२३-२४ या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणाा केली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहीसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ८९ पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये कोल्हापूरच्या सात जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मानसिंग यशवंत पाटील (पॅरा जलतरण) यांना जाहीर झाला. तर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडू गटात अॅथलेटिक्सपटून किरण पांडूरंग भोसले, रग्बी खेळाडू कल्याणी पाटील, पृथ्वीराज बाजीराव पाटील, वेटलिफ्टर अभिषेन सुरेश निपाणी, कुस्तीपटू सृष्टी जयवंत भोसले, सॉफ्टबॉल खेळ प्रकारात ऐश्वर्या पुरी यांना जाहीर झाला आहे.
पुण्यात शुक्रवारी, १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पुरस्कार वितरण समारंभ आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यातये णार आहेत. याप्रसंग्ी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र् चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्त्ात्रय भरणे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळयात २०२२- २३ व २०२३-२४ या दोन वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
दरम्यान खेळाडू कल्याणी पाटील ही येथील न्यू कॉलेजची विद्यार्थिनी आहे. एमए भागमध्ये शिकत आहे. राज्य सरकारतर्फे पुरस्कार जाहीर होताच न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे.