शाहू शिक्षण संस्थेतर्फे श्रीपतराव बोंद्रे यांची जयंती साजरी
schedule29 Dec 24 person by visibility 150 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकराव बोंद्रे यांची १०४ वी जयंती श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतर्फे साजरी करण्यात आली. दसरा चौक परिसरातील त्यांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, पंडितराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे माजी बी सी यु डी संचालक डॉ. डी.आर.मोरे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, शाहू फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, वेणूताई चव्हाण मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. कागले, साई हायस्कूलचे प्राचार्य संजय पाटील, शाहू आयटीआयचे प्राचार्य वाघरे, श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मोहिते उपस्थित होते. संस्थेचे अधीक्षक रुपेश खांडेकर विठ्ठल आमले, विष्णू चौगुले यांनी संयोजन केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात दादा बापू जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.प्राचार्य शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ डी एल काशीद पाटील, डॉ सरोज पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण केले. डॉ. पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. प्रा. पी. के पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ डी के वळवी यांनी आभार मानले.