महापालिका शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकर
schedule31 Dec 25 person by visibility 29 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना निवडणूक समन्वयकपदी माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळकर हे काम करत आहेत. पालकमंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते शिरोळकर यांना कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक समन्वयक म्हणून पत्र दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बालुगडे, शिवसेना कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, शारंगधर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या निवडणुकीत शिवसेना पक्ष व महायुती मधील इतर घटक पक्ष यांच्याशी समन्वय ठेवणे, नियोजन करणे अशी महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.