वीज कंत्राटी कामगार संघातर्फे प्रकाश आबिटकरांचा सत्कार
schedule29 Dec 24 person by visibility 141 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील वीज कंत्राटी कामगार संघातर्फे आरोग्यमंत्री प्रकाश आबिकटर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंत्री आबिटकर यांनी, वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांयच्या सोडवणुकीसंबंधी बैठक घेऊ व तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही दिली.
कंत्राटी वीज कामगारांनी प्रामुख्याने वीज कंत्राटी कामगाराना वयाच्या ६० वर्षांपर्यंत कॉन्टॅक्टर विरहित शाश्वत रोजगार मिळावा . कंपनी प्रशासनाने १९ टक्के पगार वाढ देण्यात आली आहे पण किमान वेतन वाढल्यानंतर १९ टक्के पगारवाढीचे रद्द करण्याचे परिपत्रक काढले आहे ते परिपत्रक रद्द करावे. हरियाणा कौशल्य बोर्डप्रमाणे महाराष्ट्रात ही महाराष्ट्र कौशल्य बोर्डाची स्थापना करून कामगारांना न्याय द्यावा अशा मागण्यांचे निवदेन देण्यात आले.
कंत्राटी वीज कामगार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष अमर जिल्हाध्यक्ष राहुल भालबर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल लांडगे, सर्कल उपाध्यक्ष दिलीप गुरव, कागल तालुका सबडिव्हिजन अध्यक्ष राजेंद्र ढाले, राहुल माने, श्रेणिक पाटील, विक्रांत कवडे, संग्राम जाधव, रमेश चव्हाण, विजय मोरे उपस्थित होते.