Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडडआता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्तावफुटबॉलच्या येत्या हंगामापासून मुलींच्यासाठी शाहू छत्रपती वूमेन्स लीग - मधुरिमाराजे छत्रपतीगडहिंग्लज युनायटेड फुटबाील असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पट्टणशेट्टीकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल - माजी सरन्यायाधीश भूषण गवईपोलिसांची पदभ्रमंती, पन्हाळगड - विशाळगड  मोहिमेत १५० जणांचा सहभागभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहातदोन वर्षांनी घुमला केशवराव भोसले नाट्यगृहात सूर - संगीताचा आवाज !  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाची नांदीवालावलकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी संगीतमय कवायतींचे सादरीकणतिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जाहिरात

 

आता केएमटीच्या जागेवर डोळा, दोन भूखंड तीस वर्षासाठी भाडयाने देण्याचा प्रस्ताव

schedule17 Aug 26 person by visibility 12 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागातंर्गत केएमटीकडील दोन भूखंड तीस वर्षे करारने भाडयाने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. शिरोली एमआयडीसी येथील ही जागा असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. या ठिकाणी केएमटीकडून ई बससाठी डेपो उभारणी प्रस्तावित होती. नवीन ई बसेस कोल्हापुरात दाखल होत आहेत. मात्र केएमटी प्रशासनाकडून दोन भूखंड तीस वर्षासाठी खासगी विकसकाकडे भाडयाचे देण्याचे नियोजन होत आहे. केएमटीची जागा खासगी विकसकाला भाडयाने देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी हा प्रस्ताव आणला आहे. दरम्यान केएमटीकडील जागा खासगी  विकसकाला भाडयाने दिल्यास ई बस डेपोसाठी जागा कुठून उपलब्ध करणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes