Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

दोन वर्षांनी घुमला केशवराव भोसले नाट्यगृहात सूर - संगीताचा आवाज !  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाची नांदी

schedule16 Aug 26 person by visibility 195 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर शुभारंभाचा पहिला मान आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल व कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तब्बल दोन वर्षांनंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सूर, संगीत आणि कलाविष्काराचा आवाज घुमला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीतसूर्य केशवराव भोसले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महापौर निकम व आयुक्त भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे सभागृह नेता मुरलीधर जाधव महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, क्रीडा सभापती विजयसिंह खाडे पाटील, आरोग्य उपसभापती वैभव माने, गटनेता आदिल फरास व नगरसेविका उपस्थित होत्या

या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वच्छता कर्मचारी शाहीर अमोल बुचडे, सचिन पन्हाळकर व अन्य स्वच्छता कर्मचारी कलाकारांनी गायन, नृत्य व विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. करवीर निवसिनी अंबबाई  व छत्रपती शाहू महाराज भूपाळी, गणेश वंदन, ‘वसुंधरेवरील भारुड’, स्वच्छता गीत, मर्दानी खेळ आदी कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. स्वच्छता कर्मचारी संजय काळे व अमोल कांबळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी महापौर निकम यांनीही ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी’ हे गीत सादर करून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी वर्षभर शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात कला सादर करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचारी कलाकारांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिकारी राम काटकर व वर्षा जोशी यांनी केले. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत, पवार सहायक अभियंता सुरेश पाटील, केशराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, संग्रामसिंह निकम उपस्थित होते
 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes