Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल - माजी सरन्यायाधीश भूषण गवईपोलिसांची पदभ्रमंती, पन्हाळगड - विशाळगड  मोहिमेत १५० जणांचा सहभागभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहातदोन वर्षांनी घुमला केशवराव भोसले नाट्यगृहात सूर - संगीताचा आवाज !  स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कलाविष्कारांनी कार्यक्रमाची नांदीवालावलकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी संगीतमय कवायतींचे सादरीकणतिटवे येथील शहीद संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरामहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजराकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटर; आशासेविकांचे कागदी काम होणार कमीयुवकांनी राष्ट्र ऐक्याच्या भावनेतून देशाला प्रगतीपथाकडे न्यावे – प्राचार्य अभयकुमार साळुंखेशाहू महाराज हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल - माजी सरन्यायाधीश भूषण गवई

schedule16 Aug 26 person by visibility 56 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 'कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे. कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स्वत:ला दिलेला शब्द पूर्ण केला. याचा आपल्याला अतिशय आनंद आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या न्यायाच्या विचारांना आदरांजली देण्याचा याद्वारे आपण प्रयत्न केला आहे. याद्वारे सहा जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे,' असे प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केले. 

कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी मार्गदर्शन केले. 
  मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमुर्ती सुमन श्याम, न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वरिष्ठतम न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख, ॲड‍िशनल सॉलिस‍िटर ऑफ इंडिया अनिल सिंह, ॲडव्होकेट जनरल मिलिंद साठे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोकराव माने, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधि परामर्शी एस. सी. खती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
 ' वर्षभराच्या कालावधीत दाखल झालेल्या 14 हजारहून अधिक प्रकरणांपैकी 12 हजारहून अधिक प्रकरणांमध्ये न्यायदानाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. यातूनच सर्किट बेंचचे महत्व अधोरेखित होते. औरंगाबाद व नागपूर पेक्षा अधिक भव्य व अद्ययावत इन्फ्राट्रक्चर उभे करण्यासाठी शासन सर्वोतोपरी आपल्या सोबत राहील. कोल्हापूर ही राजर्षी शाहु महाराजांची, त्यांच्या सामाजिक समता व न्यायाच्या विचारांची भूमी आहे. ज्या ठिकाणी राजर्षी शाहु महाराजांनी सुप्रीम कोर्ट उभे केले त्याच ठिकाणी खंडपीठाचे काम सुरु आहे. याचा आपल्याला आनंद आहे.  कोल्हापूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय व्हावे ' अशी गरज ही व्यक्त गवई यांनी केली.मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे, यांनीही भाषण केले पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी, कोल्हापूर खंडपीठाची इमारत, प्रशासकीय कार्यालय, न्यायाधीशांची निवासस्थाने, कर्मचारी निवासस्थाने तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी विधि व न्याय विभाग, राज्य सरकारने एकूण 75 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा सातबारा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे यांच्याकडे सुपुर्द केला. 
न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, महाराष्ट्र - गोवा बार असोसिएशन सदस्य विवेक घाटगे यांची भाषणे झाली. प्रारंभी बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी न्या. भारती डांगरे, न्या. माधव जामदार, न्या. शिवकुमार दिघे, न्या. राजेश पाटील, न्या. संजय देशमुख, न्या. एस. डी. चपळगावकर, न्या. शलैश ब्रम्हे, न्या. अभय मंत्री, न्या. अश्विन भोबे, न्या. निरज धोटे, न्या. रणजीत भोसले, न्या. अजित कडेठाणकर, न्या. संदेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधिक्षक निलोत्पल, महाप्रबंधक एस. सी. मुघाटे, कर्त्यव्य अधिकारी तथा प्रबंधक कोल्हापूर सर्किट बेंच व्ही. आर. कचरे, विधी सल्लागार नि- सहसचिव विलास गायकवाड, प्रबंधक तथा मुख्य न्यायमुर्तीचे सचिव ए. टी. काले यांच्यासह महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य सर्वश्री विवेक घाडगे, संग्राम देसाई, मिलिंद थोबडे, सर्किट बेंचचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण गनबावले, तेजपाल इंगळे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes