आता ‘धस’ होतय काळजात ! आय सपोर्ट प्राजक्ता !!
schedule29 Dec 24 person by visibility 377 categoryसामाजिक
आता ‘धस’ होतय काळजात ! आय सपोर्ट प्राजक्ता !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उठलेल्या राजकीय धुरळयामध्ये आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड यांना उद्देशून टीकेची झोड उठवली आहे. धस यांनी परळी पॅटर्नच्या इव्हेट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख करत रश्मिका मंधाना, सपना चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्या विधानाचा अभिनेत्री माळी यांनी, घाणेरडया राजकारणासाठी महिलांचा वापर करणे चुकीचे आहे. राजकारणात महिला कलाकारांना का खेचता ? आमदार धस यांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर दाद मागू असा इशारा दिला होता. दरम्यान आमदार धस यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत माफी मागणार नाही असा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे धस यांनी प्राजक्ता माळी यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा विविध माध्यमातून निषेध होत आहे. सिनेमा इंडस्ट्रीजमध्येही आय सपोर्ट प्राजक्ता ट्रेंड सुरू आहे. राजकारणातही पडसाद उमटत आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलाविषयी कोणीही चुकीचे वक्तव्ये करू नयेत असा शब्दात धस यांना कानपिचक्या दिल्या. मंत्री पंकजा मुंडे यांनी, ‘शक्ती शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे...त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलयुगातील स्वत:ला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत ? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचाार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना, पण कायद्याने नियमाने ! ते राहिले बाजूला, नुसती चिखलफे. दुर्दैवाने सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व.’अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.''
हास्यजत्राचे लेखक सचिन गोसावी यांनी ’ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो ता समाज सभ्य समजला जााते. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृतसमाज असतो. प्राजक्या माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह. क्लेषदायक आहे.’अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. कलाकार कुशाल बद्रिके यांनी म्हटले आहे की, ‘कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा तीन ते चार वेळा परळीला गेलोय. काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात. मी सुद्धा नाचताना कंबर हलवली. पण मला त्यांच कधी काही वाटलं नाही. वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहं. पण आता मात्र ‘धस’ होतय काळजात. कुणास ठाऊक स्वत:ची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेतत सुद्ध एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध. आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करु पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध प्राजक्ती मी तुझ्यासोबत आहे.”
विशाखा सुभेदार यांनी ‘प्राजक्ता माळी...मी तुझ्यासोबत आहे. आपल्या जीवावर भाषण करावी. दुसऱ्याच नाव गुंफणं विनाकारण, हे माणुसकीला धरुन अजिबातच नाही. मी निषेध करते हया वाक्याचा. आय सपोर्ट प्राजक्ता. ’म्हणत समर्थन दिल आहे.लेखिका मुग्धा गोडबोले यांनी आय सपोर्ट प्राजक्ता म्हटले आहे. निर्माते नितीन वैद्य यांनी, ‘महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांचा प्रवास विकृतीकडे सुरू झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासोबत सुसंस्कृत महाराष्ट्राने ठामपणे उभे राहिले पाहिजे. कलाक्षेत्रातील व कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी हा पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे. ही विकृती आहे.’ असे म्हटले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी,‘आमदार धस यांचे वक्तव्य मी ऐकलंय. त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्सबाबत ते वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला वेगळं वळणं देण्याची गरज नाही असं मला वाटंत. प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही. पण पुराव्याशिवाय कोणावरही शिंतोडे उडवता कामा नये. धस यांनी फक्त इव्हेंट पॉलिटिक्सबाबत वक्तव्य केलं होतं. यापलीकडे जर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो फक्त अभिनेत्रीच काय तर कोणाही बाबतीत होता कामा नये.’
....................
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. धनंजय मुंडे यांच्या कामकाजावर व इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स टीका करताना धस म्हणाले होते.....
‘ काय ते सांस्कृतिक कार्यक्रम ! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे. येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रसार प्रचार करावा. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे.’