महाराष्ट्रदिनी तेजोमय तेजोनिधी कार्यक्रम, आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनचा पुढाकार
schedule29 Apr 25 person by visibility 58 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात एक मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रचलित व अप्रचिलत गीतांवर आधारित ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम होत आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती' दादर, 'कलांगण' मुंबई आणि 'नृत्यश्री' मिरज या तीन संस्थांच्या सहयोगाने आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन, सकल हिंदू समाज कोल्हापूर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमीतर्फे 'तेजोमय तेजोनिधी' हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सात वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, नितीन वाडीकर, संतोष पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे कवित्व नृत्यातून लोकांसमोर मांडावे हा विचार मिरजेच्या 'नृत्यश्री ' संस्थेच्या संस्थापक संचालिका आणि सुप्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिक धनश्री आपटे यांनी केला. आणि परिश्रम घेऊन त्यांनी ''तेजोमय तेजोनिधी' हा सावरकरांना मानवंदना देणारा कार्यक्रम साकार केला आहे. यामध्ये
धनश्री आपटे यांच्या शिष्या सावरकरांच्या प्रचलित आणि अप्रचलीत गीतांवर आधारीत नृत्यांजली अर्पण करतील. 'कलांगण' मुंबईच्या संचालिका विख्यात गायिका वर्षा भावे ही गाणी स्वरबद्ध केली आहेत.सावरकरांचे अभ्यासक, अभिनेते श्री शरद पोंक्षे हे प्रत्येक गीताचे वैशिष्ट्ये, निर्मितीमागील प्रक्रियेचे निरुपण करतील. कोल्हापुरात या कार्यक्रमाच्या आयोजनात आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमात आपटे यांच्या शिष्या चैत्राली आठवले, सायली कुलकर्णी, ऐश्वर्या सासनूर, जुई कुलकर्णी, वैष्णवी शेट्ये, सायली रायबागकर, प्रचिती सौदागर, आणि मुक्ता निलाखे या सादरीकरण करणार आहेत. दरम्यान पत्रकार परिषदेस, सतीश आंबर्डेकर, संदीप गुळवणी, एस.के.कुलकर्णी, श्रीमती शालन शेटे आदी उपस्थित होते.