महात्मा बसवेश्वर यांचे विचार कालसुसंगत - सतेज पाटील
schedule29 Apr 25 person by visibility 110 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महात्मा बसवेश्वरांचे विचार आजही कालसुसंगत असून ते पुढे घेवून जाण्याचे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी आज येथे केले.
महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतनीकृत कार्यालयाचे लोकार्पण व अध्यासनास पाच लक्ष रूपयांच्या ग्रंथांचे हस्तांतरण समारंभ प्रसंगी आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
आमदार जयंत आसगांवकर म्हणाले, समाजामध्ये समता, बंधुता पसरविण्याची भूमिका महात्मा बसवेश्वरांनी घेतली होती, हे मार्गदर्शक विचार शरण साहित्याच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढी पुढे आले पाहिजे. शिवाजी विद्यापीठातील हे शरण साहित्य अध्यासन राज्यातील पहिले अध्यासन केंद्र आहे. कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्यामध्ये श्रमाधिष्ठित जीवन, स्वयंपूर्ण व स्वावलंबी समाज आणि स्त्री-पुरूष समानता हे सूत्र आढळते. ऑनलाईन कन्टेंटच्या माध्यमातून महामानवांचे कार्य पुढे घेवून जाण्याचे काम विद्यापीठामध्ये सुरू झालेले आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, अधिसभा सदस्य ॲड.अभिषेक मिठारी यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यासनाच्या समन्वयक डॉ.तृप्ती करेकट्टी यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानलेे.कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.शरद बनसोडे, डॉ.व्ही.एम.पाटील, डॉ.विजय ककडे, यश आंबोळे, सरला पाटील, अक्षर दालनचे आलोक जोशी उपस्थित होते.
------