माणूस व्यथा सांगू शकतो, झाडे व्यथा सांगू शकत नाहीत –त्यांचा श्वास मोकळा करा : प्रकाश आबिटकर
schedule29 Apr 25 person by visibility 39 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माणूस आपल्या व्यथा सांगू शकतो पण झाड आपली व्यथा सांगू शकत नाही. अशा झाडांच्या व्यथा समजून घेणारे माणसे आपल्यामध्ये आहेत. झाडांचा श्वास करा मोकळा, या मोहिमे मागची भूमिका आणि भावना अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापूर जिल्हात पाच लाख झाडांना आळे करण्याच्या मोहिमेला आम्ही सरकार म्हणून पाठबळ देऊ आणि ही मोहीम यशस्वी करू.’अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आझाद हिंद नेचर आर्मीतर्फे ‘झाडांचा श्वास करा मोकळा’ या मोहिमेची सुरुवात पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम उपस्थित होते. या मोहिमेंतर्गत झाडांच्या भोवती असणारे सिमेंट आणि डांबर काढून त्या झाडांचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे. ताराबाई उद्यान येथे याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपआयुक्त राहुल रोकडे, सुहास वांयगणकर, नंदकुमार सूर्यवंशी, ललित गांधी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षदीप घाटगे, डॉ विजय पाटील, आझाद हिंद नेचर आर्मीचे ट्रस्टचे परितोष उरकुडे, वृषाली मगदूम, सुनीता भोसले, अपर्णा पाटील, नितीन कांबळे आदी उपस्थित होते. सायली वाडकर यांनी सूत्रसंचालन केले. जे आर भरमगोंडा यांनी आभार मानले.