खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला राष्ट्रीय सहकार रत्न संस्था गौरव पुरस्कार
schedule28 Apr 25 person by visibility 58 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सहकार क्षेत्रामध्ये उत्तम संस्था चालवून समाजापुढे एक आदर्श ठेवल्यामुळे नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था कोल्हापूर या संस्थेला "राष्ट्रीय सहकारत्न संस्था गौरव पुरस्कार देऊन गौरविले. हा कार्यक्रम सांखळी 'गोवा येथे झाला.
माजी केंद्रीय कायदामंत्री विराप्पा मोहिली, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, इजिप्तच्या उद्योगपती एलिजाबेथ लिऑन, फौंडेशनच्या चेअरमन सीमा इंग्रोळे, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे हे प्रमुख असलेल्या निवड समितीने खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची या पुरस्कारासाठी निवड केलीं हाती. कर्नाटकचे जिल्हा कमाडंट अरविंद घट्टी व गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वित अधिकारी प्रशांत नाईक कोल्हापूरचे माजी महापौर शिंगाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या खाजगी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने संस्थापक भरत रसाळे, चेअरमन मच्छिंद्र नाळे, व्हाइस चेअरमन कृष्णात चौगुले, संचालक महादेव डावरे , शिवाजी भोसले, सात्तापा कासार, सर्जेराव नाईक व व्यवस्थापक सदाशिव साळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
……………….
‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या निवड समितीने आमच्या खाजगी शिक्षक पतसंस्थेस राष्ट्रीय सहकाररत्न संस्था पुरस्कारांनी सन्मानित केले. याबद्धल संयोजन कमिटीचे आभार मानतो.”
- भरत रसाळे, खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था कोल्हापूर