मेट्रो पुण्यात फडकला भारतीय मजदूर संघाचा झेंडा! कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणार !!
schedule29 Apr 25 person by visibility 196 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे मेट्रोमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचा मेळावा पुण्यातील शनिवार पेठेतील विश्वकर्मा भवन येथे झाला. पुणे मेट्रोमध्ये कार्यरत असलेल्या एक हजारपेक्षा जास्त कंत्राटी कामगारांनी अलीकडेच या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे.या मेळाव्यात नागपूर-पुणे मेट्रो रेल कंत्राटी कर्मचारी संघ रजिस्टर नंबर( एन पी जी 5728 ) आहे. हा कंत्राटी कामगार संघ भारतीय मजदूर संघ संलग्न आहे. ‘कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी मेट्रोतील कंत्राटी कामगारांनी भारतीय मजदूर संघाच्या सोबत एकत्रित संघर्ष करावा असे मनोगत अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले आहेत.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महेश खांदारे होते. याप्रसंगी मजदूर संघाचे महामंत्री नितीन कुकडे , संघटन सचिव प्रांजल चौधरी , भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, सागर पवार, श्रीमती बेबी राणी डे , पुणे विभागाचे उपाध्यक्ष राम सुरवसे, कार्याध्यक्ष यश निंबाळकर, संघटन सचिव राज शेलार, निकिता दंडवते, जावेद शेख, हरिश गोयर, प्रतिक रेणुकर, डेपो प्रमुख आदेश होळकर, रवींद्र वाघोले, प्रियंका जगताप, रोहित साळुंखे, सिद्धत चौरे, विलीयम अरुलादास, कैलास मोरे, कैलास चौगुले, गौरी साळुंखे, हलिमा योगिता देवने, गोरख शिंदे उपस्थित होते.
खंदारे यांनी "पुणे मेट्रोतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणे, वेतन वाढ व इतर महत्वपूर्ण प्रश्नांवर वरिष्ठ व्यवस्थापनाशी चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल." असे सांगितले. भारतीय मजदूर संघ संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी ‘आपली लढाई केवळ कामगार कल्याणासाठी आहे. कामगार हक्कांसाठी लढा देत राहू." दरम्यान या मेळाव्यात कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणे, थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधी, बोनस, मेडीक्लेम व अन्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करणे, अन्यायकारक कारवाईला तीव्र विरोध, नवीन कामगारांना मार्गदर्शन व संरक्षण प्रदान करणे, नागपूर मेट्रोप्रमाणे पुणे मेट्रो कामगारांसाठी सेवा शर्ती निश्चित करणे व अंमलबजावणी करणे असे ठराव केले.