Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
माणूस व्यथा सांगू शकतो, झाडे व्यथा सांगू शकत नाहीत –त्यांचा श्वास मोकळा करा : प्रकाश आबिटकरव्यवसाय परवाना नूतनीकरण फी दरवाढ मागे ने घेतल्यास बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलनइशरे कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी अवेस अहमद हुसैनी, सचिवपदी विजय पाटीलयूपीएससी परीक्षेतील यशवंतांचा गोकुळला अभिमान- चेअरमन अरुण डोंगळेखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला राष्ट्रीय  सहकार रत्न संस्था गौरव पुरस्कारखासदार महाडिकांची शिये गावाला भेट, स्वच्छता मोहिमेत सहभाग, सरकारी योजनांचा आढावाडॉ संजय चव्हाण यांच्या संशोधनाला जर्मन पेटंट, रासायनिक संयुगाचा शोधसीईटी सेलचे गणित चुकले, पंधराहून अधिक प्रश्नांच्या उत्तराचे पर्यायच चुकीचे ! सीएमओ ऑफिसकडे तक्रार !! कोरे अभियांत्रिकीमध्ये ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानफावल्या वेळेचा सदुपयोग, वर्गातील सगळया विद्यार्थ्यांनी केल्या कविता ! साकारला कवी उमलताना कवितासंग्रह !!

जाहिरात

 

खासदार महाडिकांची शिये गावाला भेट, स्वच्छता मोहिमेत सहभाग, सरकारी योजनांचा आढावा

schedule28 Apr 25 person by visibility 36 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या गाव वस्ती संपर्क अभियानांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी करवीर तालुक्यातील शिये गावाला भेट दिली. तसेच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. विविध शासकीय योजनांचा घेतला आढाव. आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवू, गावच्या विकासासाठी भरीव निधी देवू, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली.

 भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आणि जिल्हा संयोजक अक्षय पाटील यांनी खासदार महाडिक यांचे स्वागत केले. यावेळी शिवाजी बुवा, विकास पाटील, विक्रम पाटील, भिकाजी जाधव, उत्तम गाडवे, मारुती बुवा, हणमंत पाटील, जयसिंग पाटील, बाबासो चव्हाण उपस्थित होते. शिये गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. तर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहिली. यानंतर  त्यांनी शिये ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच शीतल कदम, उपसरपंच विलास गुरव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार महाडिक यांनी या अभियानाचा उद्देश स्पष्ट करून, ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. यावेळी राजाराम सहकारी साखऱ कारखान्याचे संचालक विलास जाधव, किरण जाधव, नीलेश कांबळे, सुनील पाटील उपस्थित होते. महाडिक यांनी शिये गावातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेतली. त्यामध्ये ठाकरे सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील यांचा समावेश होता.

शिये आरोग्य उपकेंद्राला भेट देवून वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा सूर्यवंशी यांच्याकडून आरोग्य सुविधांची माहिती, त्रुटी, कमतरता याबाबत माहिती जाणून घेतली. खासदार महाडिक यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांना भांडी वाटप आणि उज्ज्वला गॅसचे वितरण करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes