Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रुग्णालयांनी तपासणीचे- सुविधांचे दर ठळक स्वरूपात रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करावेत –आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरगुरुबाळ माळी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीरधुंद मनाचे-नव्या दमाचे, नवीन आले-वर्ष सुखाचे ! अक्षरदालनमध्ये रंगली काव्यमैफल मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी तीन जानेवारीला शोकसभाअभ्यासक्रमातील महिलांविषयक दृष्टीकोन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळामहावितरणची ग्राहकांसाठी गो ग्रीन सेवा, तर वीजबिलात एकरकमी १२० रुपये सवलतखाजगी प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद कांचनमालाराजे निंबाळकर यांचे निधनजिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुका महायुती ताकतीने लढविणार : आमदार चंद्रदीप नरकेजलतरण स्पर्धेमध्ये केआयटीला सर्वसाधारण विजेतेपद

जाहिरात

 

कुंभी, पंचगंगा कारखान्याचा ऊसदर सर्वाधिक ! खासगीमध्ये दालमिया अव्वल !!

schedule29 Dec 24 person by visibility 75 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर (एफआरपी) जाहीर केला आहे. जिल्ह्यामध्ये सोळा सहकारी तर सात खासगी कारखाने आहेत. यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा कुंभी सहकारी साखर, पंचगंगा सहकारी साखर कारखानातर्फे प्रतिटन ३३०० रुपये दर जाहीर झाला आहे. खासगी तत्वावरील कारखान्यामध्ये दालमिया भारत शुगरने ३३०० रुपये ऊस दर जाहीर केला आहे.

  कारखान्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ऊस दराची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊसाचे चौदा दिवसात बिल एफआरपीप्रमाणे देणे बंधनकारक आहेत. चौदा दिवसाच्या कालावधीत एफआरपी न दिल्यास विलंब कालावधीकरिता १५ टक्के प्रमाणे होणारे व्याज आकारण्याची तरतूद असल्याचेही मावळे यांनी म्हटले आहे.  

सहकारी तत्वावर चालणाऱ्या आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना (गवसे ) प्रति टन ३१०० रुपये, श्री भोगावती सहकारी साखर कारखान्यातर्फे ३२०० रुपये, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातर्फे ३०५० रुपये, कागल येथील श्री शाहू साखर कारखान्यातर्फे ३१०० रुपये, शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्यातर्फे ३१४० रुपये दर जाहीर केला आहे. बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यातर्फे ३२०० रुपये, कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखान्यांने ३१५० रुपये, हमिदवाडा येथील श्री सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यातर्फे ३१०० रुपये दर जाहीर केला आहे.

कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यातर्फे ३३०० रुपये, देशभक्त रत्नाप्पाण्ण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातर्फे ३३०० रुपये दर जाहीर केला आहे. नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याने यंदा ऊसाला प्रतिटन ३१०० रुपये दर दिला आहे. वारणानगर येथील श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यातर्फे ३२२० रुपये दर दिला आहे. गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने ३१५० रुपये. गडहिंग्लज तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याने अद्याप दर जाहीर केला नसल्याचे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी म्हटले आहे.  

................................................................................................................………………

खासगी तत्वावरील कारखान्यात दालमिया अव्वल

बांबांवडे येथील अथणी शुगरने ३२२० रुपये दर जाहीर केला आहे. दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजतर्फे प्रतिटन ३३०० रुपये, शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्सतर्फे ३१५० रुपये, चंदगड तालुक्यातील इको केन एनर्जी लिमटेड म्हाळुंगे खालसा साखर कारखान्यातर्फे ३१०० रुपये, ओलम ग्लोबल अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड राजगोळी येथील कारखान्यातर्फे ३१००, सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीतर्फे ३१०० रुपये, ओंकार शुगर अँड डिस्टलरी पॉवर फराळे येथील कारखान्यातर्फे ३२०० रुपये, अथणी शुगर्स लिमिटेड अंतुर्ली-तांभाळे कारखान्यातर्फे ३१०० रुपये, अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हलकर्णी येथील कारखान्याने ३१०० रुपये दर दिला आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes